जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दाखवला बसला हिरवा झेंडा
जळगाव | जळगाव तालुक्यातील कृषी विभाग व उमेद अभियानांतर्गत महिला व पुरुष शेतकरी पाणी फाउंडेशनच्या ‘फार्मर कप’ निवासी प्रशिक्षणासाठी के.व्ही.के. जळगाव जामोद सेंटर, जिल्हा बुलडाणा येथे रवाना झाले. या प्रशिक्षणाचा उद्देश शेतकऱ्यांना जलसंधारण, शाश्वत शेती पद्धती व ग्रामविकास विषयक मार्गदर्शन करणे हा आहे.
या प्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या बस ला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी प्रोजेक्ट डायरेक्टर (DRDA) श्री. राजू लोखंडे, जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी, उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती देसले, कृषी अधिकारी स्नेहल थेऊरकर, बीडीओ चंद्रकांत बोडरे, उमेद तालुका अभियान व्यवस्थापक देवेंद्र सुर्यवंशी तसेच पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक प्रल्हाद आरसुळे, उपविभागीय समन्वयक सुहास मोहिते, प्रियंका बैसाणे व तेजस निकुंभ आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा दाखवून शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी घुगे यांनी शेतकरी बांधवांना शुभेच्छा देत फार्मर कप प्रशिक्षणात जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. त्यांनी जलसंवर्धन व शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेण्याचेही त्यांनी आवाहन केले.















Discussion about this post