मुंबई । गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या भावात सतत वाढ होताना दिसत आहे. अक्षरश: सोन्याच्या भावाने आकाशाला स्पर्श केला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचा समजला जाणारा हा मौल्यवान धातू आता सर्वसामान्यांना न परवडणारा झाला आहे. दरम्यान सोन्याचे दर एका दिवसात ११,७७० रुपयांनी महागलं आहे. सोन्याच्या दरातील ही सर्वाधिक वाढ आहे.
सोन्याचे दर वाढले
२४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ११,७७० रुपयांनी वाढले आहेत. सोन्याचे दर जवळपास १,७८,८५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ९,४१६ रुपयांनी महागलं आहे. हे दर १,४३,०८० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे १,१७,७०० रुपयांनी वाढ झाली असून हे दर १७,८८,५०० रुपये झाले आहेत.
२२ कॅरेटचे दर
२२ कॅरेट सोन्याचे दर १ तोळ्यामागे १०,८८० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,६३,९५० रुपये झाले आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८,६४० रुपये झाले आहेत हे दर १,३१,१६० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १,०८,००० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १६,३९,५०० रुपये झाले आहेत.















Discussion about this post