सरकारी बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. स्टेट बँकेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
या नोकरीसाठी अर्जप्रकिया सुरु झाली आहे.या नोकरीसाठी तुम्ही ५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करु शकतात. वाइस प्रेसिडंट (UX),डेप्युटी वाइस प्रेसिडेंट (UX), असिस्टंट वाइस प्रेसिडेंट (UX),सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह (UI&UX) या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. एकूण १२ रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी ५० वयोगटातील उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला पॅकेजदेखील चांगले मिळणार आहे.
पात्रता
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बैचलर ऑफ डिजाइन/बीटेक/बी.ई की डिग्री कंप्यूटर साइंस/कंप्यूटर सायन्स अँड इंजीनियरिंग/ सॉफ्टवेयर इंजीनियरिंग/इनफॉर्मेशनट टेक्नोलॉजी/इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत त्यांच्याकडे ह्युमन फॅक्टर इंटरनॅशनल, गुगल UX/इंटरेक्शन डिजाइन फाउंडेशनचा UX चा कोर्स केलेला असावा.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बँकिंग, ई कॉमर्स, आयटी कंपनीत १५ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. वेगवेगळ्या पदांसाठी कामाचा अनुभव वेगवेगळा असावा. या नोकरीसाठी ५० वयोगटापर्यंत उमेदवार अर्ज करु शकतात.
८० लाखांच्या पॅकेजची नोकरी
स्टेट बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. ही भरती ५ वर्षांच्या कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. या नोकरीसाठी ४० ते ८० लाखांचे पॅकेज मिळणार आहे. डेप्युटी मॅनेजर पदासाठी ६४,८२० ते ९३,९६० रुपये पगार मिळणार आहे.















Discussion about this post