जळगाव । जळगाव महापालिकेत महायुतीकडून गटनेतेपदी प्रकाश बलानी यांची तर उपगटनेतेपदी नितीन बरडे यांची नियुक्ती करण्यात आली. यासोबतच प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांची निवड करण्यात आली.
जळगाव महानगरपालिकेत महायुतीने तब्बल ६९ जागांवर घवघवीत यश मिळविले आहे. यांनतर महापालिकेत महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवरील महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण झाली असून नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात महायुतीच्या गटनेतृत्वाची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. या नोंदणीमुळे महापालिकेतील सत्ताकारणाला औपचारिक स्वरूप प्राप्त झाले
महायुतीकडून गटनेतेपदी प्रकाश बलानी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गट महापालिकेतील कामकाज पुढे नेणार आहे. उपगटनेतेपदी नितीन बरडे यांची नियुक्ती करण्यात आली असून पक्षांतर्गत समन्वय, सभागृहातील भूमिका तसेच निर्णय प्रक्रियेत त्यांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. यासोबतच प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांची निवड करण्यात आली असून सभागृहातील शिस्त, नियोजन आणि रणनीती आखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.















Discussion about this post