नाशिक । नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीसह मित्रपक्षांचा धुव्वा उडवत स्वबळावर एकहाती सत्ता मिळवली आहे. १२२ पैकी एकट्या भाजपने 72 जागांवर आपले उमेदवार निवडून आणले असून भाजपचा महापौर बसणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सगळे विजयाचा आनंद साजरा करत असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमदार राहुल ढिकले आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपला डिवचले आहे. त्यामुळे निकालानंतरही राजकीय आरोप–प्रत्यारोपांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
(आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार)
राहुल ढिकले- साने निवडून आला महंजे अवघड आहे
तुमची कृपागिरीश महाजन: मुसलमानांना मुळे झाला *चिपड्या* बोला साहब आपको पॅनल नही निकाल के दिया तो मुझे जेल मे डाल देना काय महंतो/ अगर मैंने तुमको वोटिंग निकाल के नहीं दिया तो
आमदार बाई भेटू देत नवती pic.twitter.com/0Dp0kzYryw
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 20, 2026
संजय राऊत यांनी ‘एक्स’वर हा व्हिडिओ शेअर करत “आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार”, असे म्हटले आहे. या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी गिरीश महाजन आणि राहुल ढिकले यांच्या संभाषणाचा उल्लेख केलाय. राहुल ढिकले – साने निवडून आला म्हणाले अवघड आहे, तुमची कृपा, गिरीश महाजन – मुसलमानांमुळे झाला ‘चिपड्या’, बोला साहब आपको पॅनल नही निकाल के दिया तो मुझे जेल मे डाल देना, अगर मैंने तुमको वोटिंग निकाल के नहीं दिया तो… आमदार बाई भेटू देत नवती, असा आशयाचे संभाषण राहुल ढिकले आणि गिरीश महाजन यांच्यात झाल्याचा व्हिडीओ संजय राऊत यांनी शेअर केलाय. यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भाजपकडून या व्हिडीओवर काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.















Discussion about this post