कर्नाटक सरकारने पोलिस महासंचालक दर्जाचे अधिकारी रामचंद्र राव यांना निलंबित केले. राव हे त्यांच्या कार्यालयातील महिलांशी अयोग्य वर्तन करताना दिसणारा एक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. व्हिडिओमध्ये राव महिलांना मिठी मारताना आणि चुंबन घेताना दिसत आहेत. या व्हिडिओंमुळे प्रशासन आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, कर्नाटक सरकारने राव यांना तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणामुळे कर्नाटकात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.तर दुसरीकडे रामचंद्र राव यांनी सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. तसेच हे व्हिडिओ पूर्णपणे बनावट आणि खोटे असल्याचे म्हटले आहे.
व्हायरल व्हिडिओंनंतर राव यांची गृहमंत्र्यांशी भेट
कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या निवासस्थानाबाहेर माध्यमांशी बोलताना राव यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी, “मला पूर्णपणे धक्का बसला आहे. हे व्हिडिओ बनावट आहेत. माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही.” असे त्यांनी म्हटले. तसेच “आजकाल कोणालाही बनावट व्हिडिओ बनवता येतो आणि त्यांची प्रतिमा खराब करण्याचा हा कट असू शकतो” असेही त्यांनी म्हटले.
कर्नाटक के DGP साहब अपने राज्य में महिला सशक्तिकरण को आगे बढ़ाते हुए ।🤡
बस ये समझ नहीं आ रहा है वीडियोग्राफी के लिए अपना स्टाफ बैठा रखा था या AI बता दिया जाएगा । pic.twitter.com/E61K574iY8
— खुरापात (@KHURAPATT) January 19, 2026
आठ वर्षे जुना व्हिडिओ
समोर आलेल्या वृत्तानुसार, हे व्हिडिओ जुने असू शकतात का असे विचारले असता रामचंद्र राव यांनी, “जर आपण जुन्या व्हिडिओंबद्दल बोललो तर ते सुमारे आठ वर्षांपूर्वीचे होते, जेव्हा ते बेळगावमध्ये तैनात होते. मात्र, त्यांनी पुन्हा सांगितले की त्यांचा या व्हिडिओंशी कोणताही संबंध नव्हता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, राव यांनी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शक्य झाले नाहीत. सरकारने सूचित केले आहे की संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि तपास अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, “आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. कोणीही कायद्यापेक्षा वर नाही, ते कोणत्याही पदावर असले तरी. आम्ही चौकशी करू आणि नंतर पुढील कारवाई करू.”















Discussion about this post