जळगाव । नयनतारा रेस्ट हाऊससमोरील रस्त्यावर भरदिवसा दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी बांधकाम व्यावसायिकाच्या डोळ्यावर सो मारून गळ्यातील ७ तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुबचंद प्रेमचंद साहित्या (वय ५८, रा. जळगाव) हे नयनतारा रेस्ट हाऊससमोरील रस्त्यावरून पायी जात होते. यावेळी एका दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांना गाठले. आरोपींनी खूबचंद यांच्या डोळ्यावर स्प्रे मारून मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील ७ तोळे वजनाची सोन्याची चेन (किंमत सुमारे २ लाख ४० हजार रुपये) बळजबरीने तोडून पळ काढला.
घटनेनंतर साहित्या यांनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली, त्यानुसार जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. गुन्ह्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक राहुल तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार अनिल वाघ करत आहे.















Discussion about this post