नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी मिळालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यादरम्यान न्यायालयाने राहुल गांधी यांच्या विरोधात युक्तिवाद करणार्या तक्रारदार पूर्णेश मोदी यांचे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांना विचारले की, न्यायालयाने जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्याचे कोणते कारण दिले आहे. यापेक्षा कमी शिक्षा देता आली असती. त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेचे हक्कही अबाधित राहतील.
सुप्रीम कोर्टाने म्हटले की, गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा आदेश वाचणे खूप मनोरंजक आहे. यामध्ये त्यांनी खूप प्रचार केला आहे. त्याचवेळी सॉलिसिटर जनरल म्हणाले की, मला सांगायचे आहे की अनेकवेळा कारणे न दिल्याने सर्वोच्च न्यायालयावर टीका केली जाते, त्यामुळेच उच्च न्यायालय तपशीलवार कारणे देते. अशा टिप्पण्या थोड्या निराशाजनक असू शकतात. सध्या या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात निर्णय लिहिला जात आहे, याचा अर्थ न्यायालय काही वेळातच निर्णय देईल, अशी अपेक्षा आहे.
Discussion about this post