मुंबई । मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपचा फॉर्म्युला निश्चित झाला असून या जागावाटपात महायुतीचा घटकपक्ष असलेल्या रामदास आठवलेंच्या आरपीआयला देखील जागा देणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आठवलेंच्या पक्षाला निराशा पदरी पडली. यानंतर आज रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाने तब्बल ३९ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.. हा भाजप आणि शिंदे गटासाठी झटका मानला जात आहे.
मुंबईतील विशिष्ट भागांमध्ये रामदास आठवले यांना मानणारा आंबेडकरी समाज आहे. रामदास आठवले यांच्यामुळे हा समाज आतापर्यंत महायुतीच्या पाठिशी उभा राहिला आहे. मात्र, आता रामदास आठवले यांनी स्वतंत्रपणे रिपाईचे उमेदवार रिंगणात उतरवल्यास दलित टक्का जास्त असलेल्या मुंबईतील वॉर्डांमध्ये भाजप आणि शिंदे गटाची डोकेदुखी वाढू शकते.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सार्वत्रिक निवडणूक साठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने जाहीर झालेल्या सर्व अधिकृत उमेदवारांना निवडणुकीसाठी आणि प्रचंड विजयासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! pic.twitter.com/OG377MtSOZ
— Ramdas Athawale (@RamdasAthawale) December 30, 2025
भाजप- शिंदे गटाने आपल्याला 7 जागा द्यायचे कबुल केले होते. मात्र, दोन्ही पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारी यादीत रिपाईच्या एकाही उमेदवाराचा समावेश नाही. त्यामुळे रिपाईने मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.















Discussion about this post