जळगाव । जळगाव शहरातील नवीन बी.जे. मार्केटमधील प्रिंटींग प्रेस दुकानाला भीषण आग लागली असून भीषण आगीत लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. या घटनेमुळे मार्केटमध्ये एकाच गोंधळ उडाला. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे.
नवीन बी.जे. मार्केट येथील तिसऱ्या मजल्यावर विकास नारखेडे यांच्या मालकीचे अमोल इंटरप्रायझेस नावाचे प्रिंटींग प्रेस दुकान आहे. या ठिकाणी लहान मोठे पत्रक छापाईचे काम केले जाते. गुरूवारी ३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शार्टसर्कीटमुळे अचानक आग लागली.
यामुळे काही वेळात भीषण आगीत रूपांतर झाले. यावेळी मार्कटमधील नागरीकांची मोठी धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. या आगीत दुकानातील छापाई मशीनरीसह कागद जळून नुकसान झाले आहे.
Discussion about this post