पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही भारत सरकारची कंपनी असून या कंपनीत कंपनी सेक्रेटरी होण्याची उत्तम संधी आहे. एकूण ४८ जागांवर भरती केली जाणार आहे.
या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्याआधी अर्ज करावेत. तुम्ही www.powergrid.in वर अर्ज करु शकतात.
आवश्यक पात्रता
या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार इंस्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चा असोसिएट मेंबर असायला हवा. या नोकरीसाठी तुम्ही सीएस केलेले असावे. याचसोबत १ वर्षांचा अनुभव असायला हवा. इंटर्नशिप आणि ट्रेनिंगचा अनुभव यामध्ये सहभागी केला जाणार नाही. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २८ वर्षे असावी.
निवड प्रक्रिया :
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी स्क्रिनिंग टेस्टद्वारे भरती केली जाणार आहे. यानंतर इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. त्यानंतरच उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
एवढा पगार मिळेल?
पीजीसीआयएलमधील नोकरीसाठी निवड झाल्यावर ३०,००० रुपये ते १,२०,००० रुपये पगार मिळणार आहे. त्यामुळे लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी www.powergrid.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर Job Opportunities मध्ये Openings मध्ये जा.
यानंतर Engagement Of Experienced Company Secretary Professional On Fixed Tenure Basis-2025 यावर क्लिक करा.
यानंतर ई मेल आयडी, मोबाईल नंबर आणि इतर माहिती टाका.
यानंतर लॉग इन करुन फॉर्म भरा. यामध्ये तुमची सर्व माहिती भरा.
यानंतर पासपोर्ट साइज फोटो आणि सही अपलोड करा.
फॉर्म सबमिट करण्यापूर्वी त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.















Discussion about this post