नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. कोल इंडिया लिमिटेडमध्ये भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. ट्रेनी पदांसाठी ही भरती होणार असून या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे. अर्जप्रक्रिया २६ डिसेंबर २०२५ पासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्याआधी अर्ज करावेत.
कोल इंडिया लिमिटेडमधील भरती मोहिमेत एकूण १२५ जागांवर भरती केली जाणार आहे. त्यामुळे जर तुमचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले असेल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे.
कोल इंडिया लिमिटेडमधील या नोकरीसाठी अर्ज करणा्या उमेदवारांनी इंटरमीडीएट किंवा चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा पास केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा २८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
कोल इंडिया लिमिटेडमधील नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांनी २२,००० रुपये पगार मिळणार आहे. ट्रेनी पदावर तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी उत्तम संधी असेल.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला coalindia.in वर जावे लागेल.
यानंतर तुम्हाला अप्लाय ऑनलाइन या लिंकवर क्लिक करायचे आहे.
यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे.
यानंतर सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करायची आहे. या फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.















Discussion about this post