जळगाव । पुणे ते छत्रपती संभाजीनगरला जोडण्यासाठी एक्सप्रेस हायवे उभारण्याची घोषणा सरकारने केली असून हा महामार्ग पूर्ण झाल्यावर जळगाववरुन पुण्याचा प्रवास सुसाट होणार आहे. या नवीन एक्सप्रेस हायवे जळगाव ते पुणे हा प्रवास भविष्यात फक्त तीन तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. महाराष्ट्राच्या कनेक्टिव्हिटीत बदल घडवून आणणारा हा महत्त्वाचा एक्सप्रेस वे असणार आहे.
पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा हा आत्याधुनिक आणि चांगला महामार्ग असणार आहे. यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ फार कमी होणार आहे. यामुळे पुणे ते जळगाव अंतरदेखील कमी होणार आहे.
सध्या पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी सहा ते साडेसहा तास लागतात. दरम्यान, या नवीन महामार्गामुळे तुम्ही फक्त २ तासात हा प्रवास करु शकतात. त्यामुळे प्रवासाचा कालावधी ३-४ तासांनी कमी होणार आहे, असा दावा नितीन गडकरींनी केला आहे.
समृद्धी महामार्गाला जळगाव जोडणार
याचसोबत सरकारने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई नागपूर या महामार्गाला जळगाव जोडण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाला आहे.
३ तासात पुणे ते जळगाव
सध्या जळगावरुन अजिंठा, सिल्लोडमार्गे छत्रपती संभाजीनगरला जावे लागते. त्यासाठी अडीच तास लागतात. दरम्यान, हा रस्ता समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यापूर्वी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर असा एक्सप्रेस हायवे बांधण्यात येणार आहे. यामुळे हा कालावधी फक्त १ तासावर येणार आहे. जळगाव- छत्रपती संभाजी नगर असा १ तास प्रवास आणि तिथून पुढे छत्रपती संभाजीनगर ते पुणे असे दोन तास गृहीत धरले तर तुमचा प्रवास फक्त तीन तासाचा होणार आहे. जळगाववरुन पुण्याला फक्त ३ तासात पोहचता येणार आहे.
पुणे ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गासाठी १६ कोटी ३१८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग आत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील औद्योगिक , व्यापारी आणि सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे.















Discussion about this post