रेल्वेत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने रेल्वेने लेव्हल १ अंतर्गत पदभरती जाहीर केली आहे. रेल्वेने लेव्हल १ च्या ११ कॅटेगरीअंतर्गत २२००० पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे.
आरआरबीचे चेअरमन संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा जानेवारी २०२६ पर्यंत अर्जप्रक्रिया सुरु होऊ शकते. एकूण २२००० पदांसाठी भरती जाहीर केली जाणार आहे.
या पदांसाठी होणार भरती :
ट्रॅक मॅनेजर ग्रेड ४ पदासाठी ११००० जागा रिक्त आहेत. ट्राफिक बी पॉइंट पदासाठी ५००० जागा रिक्त आहे. असिस्टंट (एस एव टी) १५०० जागांसाठी होणार आहे. असिस्टंट (ऑपरेशन) पदासाठी ५०० जागा रिक्त आहेत. असिस्टंट लोको शीट पदासाठी २०० जागा रिक्त आहेत. असिस्टंट टीआरडी पदासाठी ८०० जागा आहेत. असिस्टंट पी वे पदासाठी ३०० जागा रिक्त आहे. ट्रॅक मशीन असिस्टंट पदासाठी ६०० तर ब्रिज असिस्टंट पदासाठी ६०० जागा रिक्त आहेत.
ग्रुप डी पदांसाठी भरती
लेव्हल १ सोबतच ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत रेल्वेने कोणत्याही प्रकारची अधिसूचना जाहीर केलेली नाही. मात्र, लवकरच याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या नोकरीसाठी पात्रता वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी पात्रतेनुसार अर्ज करायचे आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल.















Discussion about this post