भडगाव । भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील बेपत्ता बालिकेचा मृतदेह कुट्टीच्या ढिगाऱ्याखाली दडपलेल्या अवस्थेत आढळून आला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, तीन दिवसापूर्वीच म्हणजेच ३० जुलैला वर्षीय बालिकाबेपत्ता झाल्याची तक्रार भडगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. कल्याणी संजय पाटील असे मृत मुलीचे नाव आहे.
बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस खात्यातर्फे या बालिकेचा शोध घेण्याचे काम सुरु होते. या बालिकेचा तपास सुरू असतानाच १ रोजी गावातील एका गोठ्यातील कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात ही बालिका मृत अवस्थेत आढळून आली.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपविभागीय अधिकारी अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, कजगाव पोलीस मदत केंद्राचे छबुलाल नागरे, नरेंद्र विसपुते यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि निलेश राजपुत, सहा. फौ. अनिल जाधव, पो.हे.कॉ. लक्ष्मण पाटील, प्रितम पाटील यांच्यासह भडगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली.
Discussion about this post