मुंबई । सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील एन.डी. स्टुडिओत आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. हिंदीतील अनेक चित्रपटांसाठी त्यांनी काम केले आहे.
प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी आत्महत्या केली. मुंबईतील एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली आहे. काही दिवसांपूर्वी नितीन देसाई यांच्यावर 51 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप झाला होता. नितीन देसाई यांनी हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास, जोधा अकबर आणि प्रेम रतन धन पायो या चित्रपटांचे सेट डिझाइन केले होते. त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
नितीन देसाई हे मराठी चित्रपट-कलादिग्दर्शक, चित्रपटदिग्दर्शक व निर्माते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले आहे. चित्रपटसृष्टीत येण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कलाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले होते. 1987 पासून त्यांची चित्रपट क्षेत्रातील कारकीर्द सुरू झाली.
Discussion about this post