मुंबई । आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया तब्बल 90.43 रुपये या स्तरावर पोहोचला असून रुपयातील ही घसरण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गंभीर संकेत देणारी ठरत आहे. यामुळे आयात खर्च, इंधन बिले, तसेच उद्योगांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, रुपयाच्या या अभूतपूर्व पडझडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2014 पूर्वीचा एक व्हिडिओ ट्विट करत सरकारला खोचक टोला लगावला आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया नव्वदीच्या पार गेल्याने सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचे जुने भाषण वेगाने व्हायरल होत आहे. 2014 पूर्वी जेव्हा रुपया घसरत होता, तेव्हा नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवर कडाडून टीका केली होती. “मी सरकारमध्ये आहे, मला माहीत आहे, अशा पद्धतीने रुपया घसरूच शकत नाही. दिल्लीतील सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल, देश तुमच्याकडे उत्तर मागत आहे,” असे विधान मोदींनी केले होते.
आज डॉलरच्या तुलनेत रुपयाने नव्वदी ओलांडली असून शतकी खेळी करण्याकडं वाटचाल सुरुय.. अशा परिस्थितीत मा. नरेंद्र मोदी साहेबांचं २०१४ पूर्वीचं हे भाषण आजही तंतोतंत लागू पडतंय. त्यावेळी ते तत्कालीन केंद्र सरकारला विचारत होते ‘‘जवाब देना पडेगा आपको, देश आपसे जवाब मांग रहा हैं!’’ आजही… pic.twitter.com/jaMYy5rvz0
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 4, 2025
रोहित पवारांची पोस्ट काय?
आमदार रोहित पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या 2014 पूर्वीच्या भाषणाचा धागा पकडत ट्विट केले आहे “आज डॉलरच्या तुलनेत रुपयाने नव्वदी ओलांडली असून शतकी खेळी करण्याकडं वाटचाल सुरुय.. अशा परिस्थितीत मा. नरेंद्र मोदी साहेबांचं २०१४ पूर्वीचं हे भाषण आजही तंतोतंत लागू पडतंय. त्यावेळी ते तत्कालीन केंद्र सरकारला विचारत होते ‘‘जवाब देना पडेगा आपको, देश आपसे जवाब मांग रहा हैं!’’ आजही देश केंद्र सरकारला हेच विचारतोय..!” असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.















Discussion about this post