जळगाव । नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे प्रचार शिगेला पोहोचले होते. आज अखेर मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात 16 नगरपरिषदा व २ नगरपंचायतींसाठी मतदान सुरू आहे.
सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत जिल्ह्यात एकूण ६.१ टक्के एवढे मतदान पार पडले. एकूण ८ लाख ८१ हजार ५१० मतदारांपैकी आतापर्यंत ५२ हजार ९७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ३० हजार ४७९ पुरुष तर २२ हजार ४९५ महिलांनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावला.
















Discussion about this post