पत्रकारितेचं शिक्षण घेतलं असेल आणि नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. दुरदर्शन केंद्रात भरती प्रक्रिया जाहीर झाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
दूरदर्शनमधील ही भरती रीजनल न्यूज युनिट, दूरदर्शन केंद्र भोपाळ येथे केली जाणार आहे. येथे न्यूज रीडर आणि कॉपी एडिटर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. जर तुम्हाला कॅमेरा हाताळण्याची सवय असेल आणि तुम्हाला भाषेचं उत्तम ज्ञान असेल तर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ४ नोव्हेंबर रोजी सुरु झाली आहे. २१ ते ५० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. न्यूज रीडर पदासाठी १६० रुपये आणि कॉपी एडिटर पदासाठी १५०० रुपये प्रतिदिन पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड टेस्ट आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.
न्यूज रीडर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पत्रकारिता विषयात पदवी प्राप्त केलेली असावे. ज्यांना कॅमेरापुढे काम करण्याची सवय असेल याचसोबत भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. याआधी टीव्ही किंवा रेडिओमध्ये काम केलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
कॉपी एडिटर पदासाठी उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेली असावी. पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशनमध्ये डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केलेला असावा. याचसोबत संबंधित क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव असावा.
या नोकरीसाठी अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे तसेच अनुभवाच्या प्रमाणपत्रांची कॉपी डायरेक्ट न्यूज, रीजनल न्यूज युनिट, दूरदर्शन केंद्र, श्यामला हिल्स, भोपाळ-४६२०१३ येथे पाठवायची आहेत.















Discussion about this post