मालेगाव । नाशिक ग्रामीण पोलिसांनी मालेगावात मोठा कारवाई करत बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 10 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मालेगाव भागात बनावट नोटा चलनात असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गुप्त पाळत ठेवत सापळा रचला आणि दोन संशयितांना रंगेहात पकडलं. त्यांच्या ताब्यातून विविध मूल्यांच्या बनावट नोटांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या बनावट नोटा अत्यंत कुशलतेने छापण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
प्रमुख सूत्रधार कोण?
या बनावट नोटा कुठे छापल्या गेल्या, कोणत्या माध्यमातून त्या बाजारात चलनात आणल्या जात होत्या आणि या रॅकेटचा प्रमुख सूत्रधार कोण आहे, याचा शोध सुरू करण्यात आला आहे . जप्त करण्यात आलेल्या नोटा फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासासाठी पाठवण्यात आल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुरक्षा चिन्हांसह नोटांवरील विशेष चिन्हांची पडताळणी केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक), 489 सी (बनावट चलनी नोटांचा साठा ठेवणे) आणि 479 डी (बनावट नोटा तयार करणे) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपींची पोलिस कोठडीची मागणी केली जाईल, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.















Discussion about this post