Tuesday, March 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्य नाट्य स्पर्धा संभाजीराजे नाट्यगृहातच

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 25, 2025
in जळगाव जिल्हा
0
राज्य नाट्य स्पर्धा संभाजीराजे नाट्यगृहातच
बातमी शेअर करा..!

जिल्हाधिकार्‍यांनी तत्परतेने घेतला निर्णय, रंगकर्मीच्या उत्साहाला उधाण

जळगाव – येत्या नोव्हेंबर महिन्यापासून महाराष्ट्र कार्य संचालनालयातर्फे मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा सुरु होत आहे. यासाठी जिल्हाधिकारी रोहन धुगे यांनी दि. 24 ऑक्टोबर रोजी तातडीने छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाची पाहणी करत सदिच्छा भेट दिली. यावेळी रंगकर्मींना स्पर्धा संभाजीराजे नाट्यगृह उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वस्तही केले. यावेळी रंगकर्मीमध्ये नवीन उत्साह संचारला असून त्यांनी जिल्हाधिकार्‍यांचे यावेळी आभार मानले.

छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाचा मक्ता हा एका खासगी संस्थेकडे होता. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांनी हा मक्ता सोडल्याने नाट्यगृह ओस पडले होते. दरम्यान, नाट्यगृहाची कोणतीही टेंडर प्रक्रिया निघाली नसल्याने स्थानिक रंगकर्मींची हक्काची मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा होणार कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावेळी शहरातील रंगकर्मींनी एकत्र येत जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरावा केला. दरम्यान, यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी नाट्यगृहाला भेट देत रंगकर्मींच्या सर्व अडी-अडचणी ऐकून घेत यावर लवकरात लवकर तोडगा काढून मराठी हौशी स्पर्धा ही 15 नोव्हेंबरला नाट्यगृहात होणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी दिलेल्या सूचना आणि निर्माण होणार्‍या समस्या या समस्त रंगकर्मीनी ऐकून घेत त्यावर तोडगा कसा काढला जाईल, यावर चर्चा विनिमय करण्यात आले. यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.डी.पाटील, कनिष्ठ अभियंता मुकेश सोनवणे, ज्येष्ठ रंगकर्मी नाट्यकर्मी चिंतामण पाटील, रमेश भोळे, शंभू पाटील, अनिल मोरे, डॉ.वैभव मावळे, गौरव लवंगले, विशाल जाधव, हर्षल पाटील, अमोल ठाकूर, आकाश बाविस्कर, नाट्यगृहाचे तांत्रिक सहाय्यक विजू पाटील आदी उपस्थित होते.

नाट्यगृहाचा मक्ता ऐरणीवर

छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह मुळात महानगरपालिका यांनी हातात घेणे गरजेचे असले तर एका खासगी संस्थेने ते व्यवस्थितरीत्या सांभाळले. मात्र, आता त्यांनी मक्ता सोडल्याने हे नाट्यगृह कोण चालवणार, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर जिल्हाधिकार्‍यांनी तोडगा काढणे गरजेचे असल्याचे मत येथील स्थानिक रंगकर्मींकडून व्यक्त होत आहे.

समिती नेमण्याची मागणी

कोणत्याही संस्थेला हे नाट्यगृह चालवण्याचा मक्ता देण्यात आला तर त्यावर शिक्षित आणि ज्येष्ठ रंगकर्मींची समिती नेमण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे. कारण कोणत्याही संस्थेला हे नाट्यगृह देण्यात आले तर मनमानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने स्थानिक रंगकर्मींची समिती नेमून ती या नाट्यगृहाची देखरेख करण्याची मागणी रंगकर्मीकडून होताना दिसत आहे.

निर्णय कौतुकास्पद

जिल्हाधिकार्‍यांनी स्थानिक रंगकर्मींच्या मागणीला तत्परतेने होकार देत नाट्यगृह उपलब्ध करून देण्याचे सांगितले, यामुळे त्यांच्या या निर्णयाचे खरंच कौतुक आहे. असे निर्णय घेणारे हे पहिलेच जिल्हाधिकारी असल्याने त्यांच्या सूचना आणि निर्णयांचे नेहमीच स्वागत करण्यात येईल.

ज्येष्ठ रंगकर्मी – रमेश भोळे

छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात स्थानिक रंगकर्मींची स्पर्धा घेण्यासाठी येथील सुविधांसाठी पाहणी केली. यावेळी येथील समस्या जाणून घेण्यात आल्या आणि यावर तात्पुरता आणि कायमस्वरुपी तोडगा कसा काढण्यात येईल, यासाठी चर्चा करण्यात आली. महानगरपालिका, बांधकाम विभाग किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत निर्णय घेण्यात येतील. दरम्यान, ज्या मूलभूत सुविधा येथे नाही, त्यासाठी लवकर काम पूर्ण करून हे नाट्यगृह उपलब्ध करून देण्यात येईल.

जिल्हाधिकारी – रोहन घुगे

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुंबई-नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष रेल्वे.. जळगाव, भुसावळला असेल थांबा

Next Post

शिंदे गटाच्या मंत्र्याचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्याच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप? शिंदे गटाने बोलावली तातडीने बैठक

शिंदे गटाच्या मंत्र्याचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 2, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page