चाळीसगावचे माजी आमदार राजीवदादा देशमुख यांचे आज हदयविकाराचा झटका आल्यामुळे निधन झाले. राजीवदादा देशमुख यांच्या निधनाने चाळीसगावसह परिसरावर शोककळा पसरली आहे.
राजीव देशमुख हे चाळीसगावचे शिल्पकार म्हणून ख्यात असलेले लोकनेते कै अनिलदादा देशमुख यांचे चिरंजीव होत. त्यांनी चाळीसगाव नगरपालिकेच्या माध्यमातून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली. तर आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली. यानंतर 2009 साली चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेत निवडून गेले. यानंतर त्यांना दोन वेळेस विधानसभेत पराभव पत्करावा लागला. गेल्या काही वर्षापासून त्यांना प्रकृती अस्वास्थाचा त्रास होत होता.
यातच ऐन दिवाळीच्या काळात हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाले. राजीवदादा देशमुख यांच्या निधनाने चाळीसगावसह परिसरावर शोककळा पसरली आहे.















Discussion about this post