महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. MPSC ने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीद्वारे 938 पदांच्या भरतीसाठी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिनांक 27 ऑक्टोबर रात्री 23.59 वाजेपर्यंत असेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोग उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक आणि लिपीक टंकलेखक पदाच्या भरतीसाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.
रिक्त पदांचा तपशील
उद्योग निरीक्षक पदाच्या 9 जागा भरल्या जाणार आहेत. तांत्रिक सहायक पदाच्या 4 जागा, कर सहायक 73 जागा आणि लिपिक टंकलेखक पदाच्या 852 जागांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.
भरतीसाठी पात्रता काय?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेला अर्ज करणारा उमेदवार भारतीय असणं आवश्यक आहे. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता उमेदवाराकडे असणं आवश्यक आहे. उद्योग निरीक्षक पदासाठी उमेदवाराकडे सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं आहे.
किती फी भरावी लागणार?
खुल्या प्रवर्गासाठी 394 रुपये पूर्व परीक्षेचं शुल्क असेल. तर मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस आणि अनाथ प्रवर्गासाठी 294 रुपये तर माजी सैनिकांसाठी 44 रुपये शुल्क असेल. मुख्य परीक्षेसाठी 544 रुपये खुल्या प्रवर्गासाठी,मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस आणि अनाथ प्रवर्गासाठी 344 रुपये तर माजी सैनिकांसाठी 44 रुपये परीक्षा शुल्क असेल.
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
इतका पगार मिळेल
या भरतीमध्ये उद्योग निरीक्षकासाठी रु. ३५,४००-१,१२,४००
तांत्रिक सहाय्यकासाठी २९,२००-९२,३००
वित्त विभागातील कर सहाय्यकासाठी २५,५००-८१,१००
लिपिक-टंकलेखकासाठी रु. १९,९००-६३,२००















Discussion about this post