जळगाव । जळगाव पोलिस मुख्यालयात कार्यरत तैनात असलेला एक पोलिस कर्मचारी फसवणुकीचा बळी ठरला आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून १,३२,१४२ रुपयांच्या वस्तू परस्पर खरेदी करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रणेश प्रकाश ठाकूर (वय ३४) असं फसवणूक झालेल्या पोलिसाचे नाव असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
शहरातील निमखेडी रोड, शिवधाम मंदिर परिसरात प्रणेश प्रकाश ठाकुर वास्तव्यास आहेत. 25 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता त्यांना 8720067307 या मोबाईल क्रमांकावरून एका व्यक्तीचा कॉल आला. कॉल करणार्याने आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादीकडे त्यांच्या क्रेडिट कार्डासंबंधी काही माहिती विचारण्याचा प्रयत्न केला
प्रणेश ठाकुर यांनी आपली कोणतीही गोपनीय माहिती त्या व्यक्तीला दिली नाही मात्र तरीही संशयिताने क्रेडिट कार्डमधून एक लाख 32 हजार 142 रुपयांच्या वस्तू परस्पर खरेदी करून त्यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी प्रणेश ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरुद्ध जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.















Discussion about this post