भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाने एनटीपीसीसाठी भरती जाहीर केली आहे. ८,८७५ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ग्रॅज्युएट आणि अंडरग्रॅज्युएट अशा दोन पदांसाठी ही भरती होणार आहे.
यामधील ५,८१७ पदे हे ग्रॅज्युएट आणि ३,०५८ पदे अंडर ग्रॅज्युएट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. पदवीधर पदासाठीच्या सर्वाधिक जागा या मालगाडी प्रबंधक पदासाठी आहे. ३,४२३ जागा या पदासाठी राखीव आहे. याचसोबत ज्युनिअर अकाउंट्स असिस्टंट कम टायपिस्ट पदासाठी ९२१ जागा रिक्त आहे. स्टेशन मास्तर पदासाठी ६१५ जागा रिक्त आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
रेल्वेत ग्रॅज्युएट पदासाठी सिनियर क्लर्क कम टायपिस्ट (६३८ पद), चीफ कमर्शियल कम तिकिट सुपरवायइजर (१६१ पद) आणि मेट्रो रेल्वेत ट्राफिक असिस्ंटट पदासाठी ५९ जागा रिक्त आहेत. याचसोबत नॉन ग्रॅज्युएट म्हणजे १२वी पास पदांसाठीही जागा रिक्त आहेत.यामध्ये कमर्शियल कम तिकिट क्लर्क पदासाठी २४२४ जागा रिक्त आहेत. अकाउंट्स कम टायपिस्ट पदासाठी ३९४ पदे, ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट पदासाठी १६३ जागा रिक्त आहेत. ट्रेन क्लर्क पदासाठी ७७ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी तुम्ही www.rrbcdg.gov.in वर जाऊन अर्ज करावेत.
यामध्ये होमपेजवर दिलेल्या टॅबवर क्लिक करा.
यानंतर ई मेल आणि मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करावे.
यानंतर तुमची सर्व माहिती, पदाची माहिती भरावी.
यानंतर फोटो आणि सही अपलोड करा.
यानंतर शुल्क भरावे आणि फॉर्म जमा करा. तुम्ही फॉर्मची प्रिंट आउट काढून ठेवा.
निवड प्रक्रिया
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड सीबीटी-१ (स्क्रिनिंग टेस्ट), सीबीटी २ (विशिष्ट परीक्षण) द्वारे होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.















Discussion about this post