Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आरामदायी व परवडणाऱ्या ई-बसेस जळगाव जिल्हावासीयांच्या सेवेत; पालकमंत्र्यांच्या हस्ते १३ बसेसचे लोकार्पण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 28, 2025
in जळगाव जिल्हा
0
आरामदायी व परवडणाऱ्या ई-बसेस जळगाव जिल्हावासीयांच्या सेवेत; पालकमंत्र्यांच्या हस्ते १३ बसेसचे लोकार्पण
बातमी शेअर करा..!

जळगाव । “जळगाव जिल्ह्यात दाखल झालेल्या ई-बसेस या पर्यावरण वाचविण्याचे नवे साधन आहेत. धूर व आवाज प्रदूषण कमी करून स्वच्छ हवा उपलब्ध करून देतील. इंधन बचतीमुळे प्रवासाचा खर्च कमी होईल आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात वातानुकूलित, आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे या ई-बसेस म्हणजे हरित प्रवासाची नवी ओळख आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ७० ई-बसेसमधील पहिल्या टप्यातील १३ बसेसचे लोकार्पण आज जळगाव आगारातील विभागीय कार्यशाळा येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले.

दृष्टीक्षेपात- ई-बसची वैशिष्ट्ये
ई – बसेस पर्यावरणपूरक असून धूर व आवाज प्रदूषण शून्य आहेत. या बसेस बॅटरीवर चालणाऱ्या असल्याने इंधनाची मोठी बचत होणार आहे. संपूर्ण वातानुकूलित असल्यामुळे प्रवाशांना थंडगार व आरामदायी प्रवासाचा लाभ मिळणार असून, पुशबॅक सीट व मोबाईल चार्जिंग यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या 13 बसेसमध्ये 12 मीटर लांबीच्या 8 व 9 मीटर लांबीच्या 5 वातानुकूलित बसेसचा समावेश आहे. 9 मीटर बस दर प्रति टप्पा ₹13.80 तर 12 मीटर बस दर प्रति टप्पा ₹15.15 असा ठेवण्यात आला असून, सर्वसामान्यांच्या आवाक्यातील दर आहेत. या बसेस जळगाव जिल्ह्यातील तालुका-ते-तालुका सेवेसह चाळीसगाव, जामनेर, शिरपूर, चोपडा तसेच छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि नाशिक या मार्गांवर धावणार आहेत

लोकार्पणानंतर प्रत्यक्ष प्रवास
या सोहळ्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ई बसची चार्जिंग प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवून दिली. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय अधिकारी यांनी विभागीय कार्यशाळेपासून विमानतळापर्यंत बसने प्रवास करून प्रत्यक्ष चाचणी केली.

या प्रवासानंतर मान्यवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले होते.विमानतळावर पहिल्यांदाच बस दाखल झाल्याने उपस्थितांनी कौतुक व आश्चर्य व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी केले. सूत्रसंचालन वाहतूक नियंत्रक संदीप सूर्यवंशी यांनी केले तर आभार संदीप पाटील यांनी मानले.

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, उपयंत्र अभियंता सुनील भालतिलक, वरिष्ठ आगार व्यवस्थापक संदीप पाटील, सुरक्षा अधिकारी दिपक जाधव, कामगार अधिकारी कमलेश भावसार, लेखाधिकारी मिलिंद सांगळे, कमलेश भावसार, विभागीय अभियंता निलेश पाटील यांच्यासह अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

Next Post

तमिळनाडूमध्ये अभिनेत्याच्या रॅलीत मोठी चेंगराचेंगरी; ३९ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तमिळनाडूमध्ये अभिनेत्याच्या रॅलीत मोठी चेंगराचेंगरी; ३९ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

तमिळनाडूमध्ये अभिनेत्याच्या रॅलीत मोठी चेंगराचेंगरी; ३९ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात तीन मंत्री असूनही केळी उत्पादक फळपीक विम्यापासून वंचित का? नाथाभाऊंचा सवाल

केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ११ कोटींपेक्षा अधिक नुकसानभरपाई मंजूर

February 27, 2026
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

9वीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; निवास, जेवणापासून ते तिकिटांचा खर्च इस्रो करणार

February 27, 2026
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर खात्यांवर ताण; कर्ज काढून खर्च भागवावा लागतोय!; विधानपरिषदेत मंत्र्यांची कबुली

February 27, 2026
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page