मुंबई । मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात सातत्याने वाढ दिसून आली. यामुळे ऐन सणासुदीत दोन्ही धातूंचे दर गगनाला भिडले आहे. दरम्यान आज मात्र सोनं-चांदी खरेदी करणऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर कमी झाले आहे. त्यामुळे सणासुदीत तुम्हाला स्वस्तात दागिने खरेदीची एक संधी उपलब्ध झाली आहे. जाणून घ्या सोन्याच्या दरात किती रुपयांनी घसरण झाली आहे आणि सोन्याचा आजचा भाव काय आहे.
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ३२० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१५,३७० रुपये मोजावे लागणार आहे. तर आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ३०० रुपयांनी कमी झाले आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,०५,७५० रुपये मोजावे लागणार आहे.
तर आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील चांगलीच घट झाली आहे. १८ कॅरेटचे १ तोळा सोन्याच्या दरात २४० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ८६,५३० रुपये खर्च करावे लागतील. आज चांदीचे दर स्थिर आहेत. चांदी खरेदी करण्यासाठी तुम्हाला कालच्या ऐवढीच किंमत मोजावी लागेल. आज एक ग्राम चांदीचा दर १४० रुपये आहे. तर १ किलो चांदी खरेदीसाठी १,४०,००० रुपये खर्च करावे लागतील.















Discussion about this post