अमळनेर । अमळनेर तालुक्यातून खुनाची घटना समोर आलीय. तालुक्यातील पैलाड येथील हेडावे नाक्यावर माथेफीरुने एका तरुणाचा दगडाने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. पोलिसांनी या माथेफिरूला अटक केली आहे. मुकेश भिका धनगर (३८, रा. स्वामी विवेकानंद कॉलनी, पैलाड) असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर निखिल विष्णू उतकर (४५, रा. करंजा, पंचवटी, नाशिक) असं संशयित आरोपीचं नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक येथील निखिल विष्णू उतकर हा गेल्या काही दिवसापापासून शहरात वेडसर म्हणून फिरत होता. नागरिक त्याला घाबरत हकलून लावत होते. तर खाण्यापिण्यासह मदतही करीत होते. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पैलाड येथील दिनेश भिका धनगर (39) यांचे काही वाद झाले असतील. त्यातून निखिल उतकर याने मुकेश याचा मुडदा पाडला.
नवरात्रीच्या पहिल्याच पहाटे ही घटना उघडकीस आल्याने पोलिसांनी घटनेच्या तपासाला वेग दिला. त्यात निखिल उतकर या संशयिताला अटक केली आहे. तर मुकेश याचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात येणार आहे.















Discussion about this post