मुंबई । मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात मोठी वाढ होताना दिसत असून यामुळे दोन्ही धातूंनी विक्रमी उच्चांक गाठला आहे. दरम्यान आज सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आज २४ कॅरेच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २२० रुपयांनी घसरण झाली आहे.तर चांदीचे दर देखील घसरले आहेत. आज सोनं आणि चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी जाणून घ्या सोनं-चांदीचे आजचे दर…
गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या २४, २२ आणि १८ कॅरेटच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये २२० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,११,७१० रुपये मोजावे लागणार आहेत. २४ कॅरेटचे १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २२०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला आज ११,१७,१०० रुपये द्यावे लागणार आहेत.
आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात देखील घसरण झाली आहे. आज २२ कॅरेटचे १ तोळा सोन्याच्या दरात २०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाल १,०२,४०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये २००० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला १०,२४,००० रुपये द्यावे लागणार आहेत.
त्याचसोबत, आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १७० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला ८३,७८० रुपये मोजावे लागणार आहे. तर १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १७०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी तुम्हाला ८,३७,८०० रुपये द्यावे लागणार आहेत.
दरम्यान, आज चांदीच्या दरात देखील घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात दोन रुपयांनी घट झाल आहे. ही चांदी खरेदीसाठी तुम्हाला १३२ रुपये मोजावे लागणार आहेत. तर १ किलो चांदीच्या दरामध्ये २००० रुपयांनी घट झाली आही. ही चांदी खरेदीसाठी तुम्हाला १,३२,००० रुपये द्यावे लागतील.















Discussion about this post