सरकारी कंपनीत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे.
ही भरती ट्रेड अप्रेंटिसशिप पदासाठी जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०२५ आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अधिकृत वेबसाइट owergrid.in वर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही पात्रता आणि इतर माहिती वाचा.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामधील नोकरीसाठी तुम्ही १०वी/आयआयटी बीई / बीएससी / संबंधित क्षेत्रात डिप्लोमा केलेला असावा.या नोकरीसाठीची पात्रता पदानुसार देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही अधिसूचना वाचा.
अर्ज प्रक्रिया
या नोकरीसाठी तुम्ही www.powergrid.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाहीयेत.
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्ही NATS/NAPS अंतर्गत अप्रेंटिसशिपसाठी रजिस्ट्रेशन केलेले असावे. याचसोबत शैक्षणिक पात्रतेचे मार्कशीट, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट असावे. याचसोबत जातीचे प्रमाणपत्र, पासबुकची पहिली प्रत, फोटो आणि सही या गोष्टी आवश्यक आहेत.
निवडप्रक्रिया
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कोणत्याही परीक्षेशिवाय आणि मुलाखतीशिवाय होणार आहे. तुम्हाला शैक्षणिक पात्रतेनुसार शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. यानंतर उमेदवारांची लिस्ट तयार केली जाणार आहे. हा अप्रेंटिसशिपचा कालावधी १२ महिन्यांचा असणार आहे. पीजीसीआयएलमध्ये १००० पदांसाठी भरती केली जाणार आहे.















Discussion about this post