देशभरात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांवर कारवाईच्या बातम्या वारंवार येत असतात. अशातच आता आसाममधून खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथे आसाम सिव्हिल सर्व्हिसेस अधिकारी नुपूर बोरा यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. तिच्या निवासस्थानासह भाड्याच्या घरात टाकण्यात आलेल्या छाप्यात तब्बल १.०२ कोटी रुपये रोख आणि १ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. लाचखोरीतून एका महिला अधिकार्याने घेतलेल्या कोट्यवधींची उड्डाणे पाहून कारवाई करणार्या अधिकारी अचंबित झाले.
नूपूर बोरा या आसाम सिव्हिल सर्व्हिस (एसीएस) अधिकारी आहेत. सध्या त्या कामरूप जिल्ह्यातील गोरोईमारी येथे सर्कल ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. मूळची गोलाघाटची रहिवासी असलेल्या बोरा २०१९ मध्ये महसूल विभागात रुजू झाल्या; पण सहा महिन्यांनंतरच अनियमित जमीन व्यवहारांच्या आरोप त्यांच्यावर होण्यास सुरुवात झाली. अखेर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली.
नूपूर बोरा यांना अटक केल्यानंतर त्यांच्या गुवाहाटी येथील तिच्या निवासस्थानातून आणि बारपेटा येथील भाड्याच्या घरात छापा टाकण्यात आला. यावेळी तब्बल १.०२ कोटी रुपये रोख आणि १ कोटी रुपयांचे दागिने सापडले. मुख्यमंत्र्यांच्या विशेष दक्षता कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाला गुवाहाटी येथील तिच्या निवासस्थानातून ९२ लाख रुपये रोख आणि १ कोटी रुपयांचे दागिने सापडले. बारपेटा येथील तिच्या भाड्याच्या घरातून आणखी १० लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.















Discussion about this post