मुंबई उच्च न्यायलयाच्या मूख्य शाखेच्या आस्थापनेवरील पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी तुम्हाला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. २१ सप्टेंबर अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ७वी/१०वी / १२वी पास असणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही अधिसूचना वाचावी. त्यानंतरच अर्ज करावेत.
मुंबई उच्च न्यायलयात सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. स्वयंपाकी-नि-शिपाई या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.त्यासाठी तुम्ही किमान ७वी पास असणे गरेजेचे आहे.
या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला १६,६०० ते ५२,४०० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरतीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी सातवी पास असावे. उमेदवाराला मराठी भाषा लिहता, बोलता आणि वाचता यावी. तसेच मान्यताप्राप्त संस्थेतून स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
मुंबई उच्च न्यायालयातील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा आणि शारीरिक क्षमता चाचणीद्वारे केली जाणार आहे. यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर उमेदवाराची निवड केली जाईल.
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ३०० रुपय शुल्क भरावे लागणार आहे. मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला,P.W.D इमारत, फोर्ट, मुंबई ४०००३२ येथे अर्ज पाठवायचा आहे.















Discussion about this post