जळगाव। मणिपूर येथे गेल्या ८५ दिवसांपासून सलग हिंसा होत असून सुमारे ३०० लोक त्यात मृत्युमुखी पडले आहेत तर १५०० लोक जखमी झाले आहेत , काही महिलांची नग्न धिंड काढण्यात आली आहे, अत्यंत भयग्रस्त होवून हजारोंच्या संख्येने लोक अन्य राज्यात निघून जात आहेत
तिथं कायदा व सुव्यवस्था पूर्णतः कोलमडली असल्याने तेथील सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करावी अशा आशयाचे निवेदन राष्ट्रपतींना जळगाव जिल्हाधिकारी यांचे मार्फत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार विरोधी संघर्ष समिती , जळगाव तर्फे उपजिल्हाधिकारी सौ. शुभांगी भारदे यांना देण्यात आले
यावेळी समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे , साहित्यिक जयसिंग वाघ , रमेश सोनवणे , दिलीप सपकाळे , सोमा भालेराव , सुरेश तायड़े , साहेबराव वानखेडे , हरिश्चंद्र सोनवणे , महेंद्र केदारे , प्रा.प्रितलाल पवार , चंद्रकांत नन्नवरे, वाल्मीक सपकाळे , संजय सपकाळे , युवराज सुरवाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते .
Discussion about this post