Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हादरा ; या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 10, 2025
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
बातमी शेअर करा..!

जळगाव । महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी कामाला लागले आहेत. मात्र त्यापूर्वी जळगाव जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जबरदस्त हादरा बसला आहे. रावेरचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अरुण पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला.

आगामी निवडणुकांच्या तोंडावर हा पक्षप्रवेश शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपमध्ये असताना रावेरचे दोन वेळा विधानसभेवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी अरूण पाटील यांना मिळाली होती. मात्र, २००९ मध्ये त्यांनी काही कारणांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. तेव्हापासून राष्ट्रवादीत स्थिरावलेल्या पाटील यांनी पक्षात फूट पडल्यानंतरही शरद पवार गटाची साथ दिली होती. मात्र, पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण आणि त्यामुळे वाढलेली दुफळी लक्षात घेता ते अलिकडच्या काळात शरद पवार गटात फार सक्रीय दिसत नव्हते. विशेषतः विधानसभेच्या निवडणुकीपासून त्यांनी पक्षाच्या बैठकांमध्येही हजेरी लावणे जवळपास थांबवले होते.

माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच डॉ.सतीश पाटील यांच्यासह माजी आमदार कैलास पाटील आणि दिलीप सोनवणे यांनी शरद पवार गट सोडून अजित पवार गटात प्रवेश केला, तेव्हा सुद्धा माजी आमदार अरूण पाटील हे शरद पवार गट सोडण्याच्या मनःस्थितीत असल्याची चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात, त्यांनी अन्य दुसऱ्या कोणत्या पक्षात जाण्याऐवजी भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, मंगळवारी आपल्या समर्थकांसह त्यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, रावेरचे आमदार अमोल जावळे, रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख नंदू महाजन, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

माजी आमदार पाटील यांच्या बरोबर राष्ट्रवादीतील (शरद पवार) जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मुरलीधर तायडे, माजी सदस्य आत्माराम कोळी, रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंदार पाटील, विकास सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, निंभोरा येथील माजी सरपंच सचिन महाले, शिंगाडीचे माजी सरपंच महेंद्र बागडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. सर्वांच्या भाजप प्रवेशामुळे रावेर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार पडले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मोठी बातमी! सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती, एनडीएने निवडणूक जिंकली!

Next Post

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! ऑगस्टच्या हप्त्याबाबत सरकारने उचललं मोठं पाऊल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली; जानेवारीचा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! ऑगस्टच्या हप्त्याबाबत सरकारने उचललं मोठं पाऊल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page