नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. ही निवडणूक एनडीएने जिंकली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सीपी राधाकृष्णन यांनी ही निवडणूक जिंकलेली आहे. त्यामुळे आता सीपी राधाकृष्णने हे देशाचे नवे उपराष्ट्रपती ठरले आहेत.
कोणाला किती मतं पडली?
राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांनी या निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर लगेच मतमोजणी करण्यात आली. यावेळी मतमोजणीनुसार सीपी राधाकृष्णन यांना एकूण 452 पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत.
तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना एकूण 300 पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एकूण 768 खासदारांनी मतदान केले होते.















Discussion about this post