जळगाव । अमेरिकेतील टॅरिफमध्ये मोठी वाढ आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र फटका बसत आहे. दरम्यान आज तर सोन्याने उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर १ लाख ६ हजार रुपये झाले आहेत.
आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ८८० रुपयांनी वाढले आहेत. प्रति तोळ्यासाठी तुम्हाला १,०६,९७० रुपये मोजावे लागणार आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७०४ रुपयांनी वाढले असून ते सध्या ८८,५७६ रुपयांना विकले जात आहे. १० तोळ्याचे दर ८,८०० रुपयांनी वाढले आहेत.
२२ कॅरेट सोन्याचे दर
२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ८०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर ९८,०५० रुपयांनी वाढले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६४० रुपयांनी वाढले आहेत. या दरात ७८,४४० रुपयांची वाढ झाली आहे. १० तोळ्यामागे ८००० रुपयांनी वाढ झाली असून हे दर ९,८०,५०० रुपये आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर
आज १८ कॅरेटचे दर प्रति तोळ्यामागे ६६० रुपयांनी वाढले असून हे दर ८०,२३० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे ५२८ रुपयांची वाढ झाली आहे. हे दर ६४,१८४ रुपये आहेत. १० तोळ्यामागे ६,६०० रुपयांची वाढ झाली आहे.















Discussion about this post