धुळे । धुळे जिल्ह्यातून अपघाताची एक दुर्दैवी घटना समोर आलीय. महामार्ग पोलिस वाहनाचे टायर फुटल्याने नंदुरबारचा तरुण अंमलदार जागीच ठार तर अन्य दोघे पोलिस गंभीर जखमी झाले. नवल वसावे असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ही घटना तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ५२ वर दहिवद गावाजवळ घडली. जखमींना शिरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे शिरपूर तालुका पोलिस ठाणे व पोलिस वर्तुळात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर-दहिवद फाटा हा धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेला एक महत्त्वाचा चौक आहे. या शिरपूर दहिवद फाट्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. महामार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनाचे मागचे टायर फुटले आणि भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये वाहनातील तरुण अंमलदार नवल वसावे यांचा मृत्यू झाला. ते पेट्रोलिंग करत असलेल्या वाहनामध्ये बसले होते. या वाहनातील आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना शिरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर-दहिवद फाट्यावर महामार्ग पोलीस वाहनाचा अपघात झाला. नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत असताना या पोलीस वाहनाचे मागील टायर फुटले आणि पोलीस वाहन अपघातग्रस्त झाले. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून आणखी दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर शिरपूरमधून खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.















Discussion about this post