जळगाव । रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर साप्ताहिक विशेष गाड्यांच्या सेवांमध्ये डिसेंबर व जानेवारीपर्यंत वाढ केली. यामुळे सणासुदीत जागेची अडचण सुटण्यास मदत होईल. या सर्व १२ गाड्या जळगाव आणि भुसावळ मार्गे धावणाऱ्या आहेत
मुदतवाढ दिलेल्या गाड्यांमध्ये उधना-सुबेदारगंज विशेष गाडीची सेवा ३० डिसेंबरपर्यंत, सुबेदारगंज-उधना गाडी २९ डिसेंबरपर्यंत, वलसाड – दानापूर २९ डिसेंबर, दानापूर वलसाड ३० डिसेंबर, उधना – खुर्दा रोड ३१ डिसेंबर, खुर्दा रोड उधना २ जानेवारी, उधना -धनबाद २६ डिसेंबर, धनबाद उधना विशेष गाडीची सेवा २८ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.
उधना जयनगर गाडी २८ डिसेंबर, जयनगर उधना २९ डिसेंबर, उधना पाटणा २६ डिसेंबर तर पाटणा – उधना विशेष गाडीची सेवा २७ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. या गाड्यांच्या थांब्यांमध्ये कुठलाही बदल केला नाही. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ विभागातून कोकणात जाता यावे यासाठी रेल्वेने विशेष – गाडी चालवावी, अशी मागणी – आहे. पण, त्यावर रेल्वे प्रशासन निर्णय घेत नाही. –















Discussion about this post