जळगाव । जर तुम्हीही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठा झटका देणारी बातमी आहे. होय.. सराफ बाजारात सोन्यासह चांदीच्या किमतीने पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड नोंदवला आहे.
सोन्याचे दर गौरी आगमनाआधीच 1 लाख 6 हजार रुपयांवर पोहोचल्याने गौरी पूजनाला सोनं खरेदी करायचं कसं असा प्रश्न पडला आहे. सोन्या चांदीच्या दागिन्यांचे बजेट कोलमडलं आहे.
आज सोन्याच्या किमतीत प्रति तोळ्यामागे १,६४० रुपयांनी वाढले आहेत. यानंत सोन्याचे दर १ लाख ४००० रुपयांपर्यंत पोहोचले. GST सह सोन्याच्या किंमती १लाख ६ हजार रुपयांवर गेले आहेत. याचबरोबर चांदीची किंमत प्रति किलो २००० रुपयांनी वाढून ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे. आज सकाळी चांदीचा भाव जीएसटीसह १,२४,००० पर्यंत पोहोचली आहे.
भारतीय बाजारातील वाढत्या सोन्या-चांदीच्या दरामागे रुपयाची कमजोरी हे एक महत्त्वाचे कारण ठरले आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा खरेदीदार असल्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यावर थेट परिणाम किंमतींवर होतो. सोन्या-चांदीच्या या उसळीने बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवला असला, तरी सामान्य ग्राहकांसाठी ही परिस्थिती चिंतेची आहे.लग्न आणि सणांच्या तयारीत असलेल्या कुटुंबांसाठी हे दर धक्का देणारे आहेत. दरम्यान अमेरिका-भारत व्यापार शुल्क आणि जागतिक राजकीय अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किंमती उच्च पातळीवर आहेत. पुढील काही दिवसांत सोन्याच्या किंमती 1,00,000 ते 1,05,000 रुपयांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.”















Discussion about this post