अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) ने फील्ड इंजिनिअर आणि सुपरवायझर या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया २७ ऑगस्टपासून सुरू झाली आहे.
पीजीसीआयएलमध्ये १५४३ पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी तु्म्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तुम्हाला https://www.powergrid.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
पीजीसीआयएलमध्ये इंजिनियरिंग केलेल्या तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. बीई/ बीटेक किंवा बीएससी इंजिनियरिंग केलेल्या तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. या भरती मोहिमेत सिविल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिकल अँड कम्युनिकेशन ब्रँचमधून इंजिनियरिंग केलेले उमेदवार अर्ज करु शकतात.
PGCIL मध्ये फिल्ड इंजिनियर पदासाठी ५३२ जागा रिक्त आहेत. सिविल फिल्ड इंजिनियर पदासाठी १९८ जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रिकल फिल्ड सुपरवायजर पदासाठी ५३५ जागा तर सिविल फिल्ड सुपरवायजर पदासाठी १९३ जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन फिल्ड सुपरवाइजरसाठी ८५ जागा रिक्त आहेत.
फील्ड इंजिनियिर पदासाठी उमेदवारांनी संबंधित इंजिनियरिंग स्ट्रीममध्ये बीई/बीटेक/ बीएससी इंजिनियरिंग केलेले असावे. फील्ड सुपरवायजर पदासाठी इंजिनियरिंगमध्ये फुल टाइम डिप्लोमा केलेला असावा.
फील्ड इंजिनियर पदासाठी ३०,००० ते १,२०,००० रुपये पगार मिळणार आहे. फील्ड सुपरवाइजर पदासाठी २३००० ते १,०५,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत विविध भत्तेदेखील दिले जाणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर मिळणार आहे. तुम्ही अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिसूचना वाचावी.















Discussion about this post