चाळीसगाव । जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मधून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी घटना समोर आलीय. ज्यात चाळीसगाव शहरात भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात चौधरी गंभीर जखमी झाले असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
दोन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महजान यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते, त्यानंतर मंगळवारी रात्री त्यांच्यावर हल्ला झाल्याचे समजतेय. चाळीसगाव शहरातील वैष्णवी साडी सेंटरजवळ रात्रीच्या सुमारास काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात चौधरी यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी धुळे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा हल्ला कोणी आणि का केला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.मात्र या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तसेच, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या भागांमध्ये पथके रवाना केली आहेत. या घटनेमागे कोणताही राजकीय किंवा वैयक्तिक वाद आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.















Discussion about this post