जळगाव : इर्शाळवाडी दुर्घटनेत गावातील अनेक घर मातीच्या ढिगार्याखाली गाडली गेली आहे. यात अनेकांना मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. यात आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला याबाबतची आकडेवारी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितला आहे.
आतापर्यंत या दुर्घटनेत 22 ते 24 लोकांचे मृतदेह हाती आले आहेत. मृतांचा आकडा हा दुर्दैवाने तीन आकडी असू शकतो, अशी भीती मंत्री गिरीश महाजन यांनी वर्तवली. . रायगड जिल्ह्यातील तळीये या ठिकाणी ज्याप्रमाणे काही दिवसांनी मृतदेहांचं शोधकार्य थांबवून पंचनामे करण्यात आले होते. त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील करावं लागेल, असेही गिरीश महाजन म्हणाले.
इर्शाळवाडी हे गाव दुर्गम भागात असल्यामुळे त्या ठिकाणी बचावकार्यात अडचणी येत आहेत. जेसीबी, ट्रॅक्टरसारखी मशिनरी त्या ठिकाणी पोहचू शकत नाही. त्यामुळे हातानेच कुदळ पावळ्याने माती कोरून मृतदेह शोधावे लागत आहेत. आता पुढच्या दोन ते तीन दिवसात मातीच्या ढिगार्याखाली दबलेले मृतदेह कुजतील. त्यामुळे मृतदेहांचं शोधकार्य थांबवावे लागेल, अशी माहिती महाजन यांनी जळगावात दिली.
Discussion about this post