रावेर। जळगाव जिल्ह्यात सकाळपासून पाऊस सुरु असून यात रावेर तालुक्याला मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. याच दरम्यान, सुकी नदीच्या पात्रातून एक तरूण बेपत्ता झाला असून याचा एसडीआरएफची टिम शोध घेत असल्याचे वृत्त आहे.
रावेर तालुक्यातील रोझोदा येथील रवींद्र दगडू चौधरी हा तरूण गारबर्डी धरण परिसरामध्ये काल सायंकाळी पोहायला गेला होता.पोहत असतांना अचानक तो नदी पात्रात बेपत्ता झाला.घटनेची माहीती तहसिलदार बंडू कापसे यांना मिळताच एसडीआरएफच्या टीमसह घटनास्थळी पोहचले असुन बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध सुरु आहे.
सुकी नदीला दोन्ही काठ भरून पाणी वाहत असुन यात बेपत्ता युवकाचा एसडीआरएफची टीम शोध मोहीम राबवित आहेत. तर आज सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुन्हा एकदा तालुक्यात मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
Discussion about this post