मुंबई । भारतामध्ये सोन्याच्या किमतीत चढउतार सुरूच आहेत. आज सोन्यासह चांदी दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांच्या नजरा अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाषणावर आहेत, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात सोने-चांदीच्या किमतींवरही परिणाम झाला आहे.
आज सोने दरात मागील दिवसाच्या तुलनेत सोन्याच्या प्रत्येक श्रेणीमध्ये प्रति ग्रॅम १ ने वाढ झाली आहे. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १०,०७६ पर्यंत पोहोचला आहे. याचबरोबर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ९,२३१ वर पोहोचला, तर १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति ग्रॅम ७,५५३ इतके झाले आहेत.
मागील आठवडाभर सोन्याच्या किमतींमध्ये काही प्रमाणात चढ-उतार झाले होते. १४ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति ग्रॅम १०,१५० वरून १०,०९१ पर्यंत खाली आले. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ९,३०५ वरून ९,२४६ पर्यंत घटले. एकूणच दर काहीसे खाली आले असले तरी ते स्थिरावलेले दिसत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना आता स्थिरतेची भावना मिळत आहे.















Discussion about this post