रिलायन्स जिओने आपल्या युजर्सला एक मोठा झटका दिला आहे. जिओने आपला स्वस्त आणि लोकप्रिय प्रीपेड रिचार्ज प्लान बंद केला आहे. जिओसोबतच एअरटेलने सुद्धा आपला स्वस्त प्लान बंद करत युजर्सला झटका दिला आहे.
जिओने युजर्सला 209 रुपये आणि 249 रुपयांचे 1GB डेटा प्रति दिवस असलेले प्लान्स बंद केले आहेत. या दोन्ही प्लान्समध्ये क्रमश: 22 दिवस आणि 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळत होती. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळत होती. मात्र, आता या दोन्ही रिचार्ज प्लानचा पर्याय हटवण्यात आला आहे.यामुळे जिओ युजर्सला रिचार्ज करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आता 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसाठी जिओ युजर्सला 299 रुपयांच्या रिचार्ज प्लानने रिचार्ज करावे लागेल. या प्लानमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ मिळतो.
एअरटेलनेही बंद केला स्वस्त प्लान
जिओ सोबतच एअरटेलने सुद्धा आपला एन्ट्री लेवल प्रीपेड रिचार्ज प्लान बंद केला आहे. या प्लानची किंमत 249 रुपये होती. या प्लानमध्ये युजर्सला हायस्पीड इंटरनेट, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचे फायदे मिळत होते. एअरटेलच्या 249 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानची माहिती आता Airtel Thanks App वर ‘Price Revised’नोटसह दिसत आहे. या प्लानची व्हॅलिडिटी 24 दिवसांची होती आणि या प्लानमध्ये युजर्सला 1GB डेटा प्रति दिवस, दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्सची सुविधा मिळत होती. याच्या व्यतिरिक्त अनेक कॉम्पिमेंट्री बेनेफिट्स मिळत होते.
249 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला इन्कमिंग कॉल्स आणि मेसेजेससाठी लाईव्ह स्पॅम अलर्ट फीचर मिळत होते. यासोबतच Airtel Xstream वर फ्री कंटेन्टचा अॅक्सेस आणि 30 दिवसांसाठी Hellotunes सब्सक्रिप्शन सुद्धा होते. एअरटेलने नुकतेच AI स्टार्टअप Perplexity सोबत पार्टनरशिप केली होती ज्या अंतर्गत कंपनी 17,000 किमतीचे Perplexity Pro सब्सक्रिप्शन 12 महिन्यांसाठी फ्री देत होती.पण आता हा प्लान बंद झाल्यानंतर एअरटेलचा 299 रुपयांचा प्रीपेड प्लान सर्वात स्वस्त पर्याय बनला आहे. या प्लानची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. तसेच या प्लानमध्ये जवळपास सर्व फायदे मिळत आहेत जे 249 रुपयांच्या प्लानमध्ये मिळत होते.















Discussion about this post