बँकेत काम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंजाब अँड सिंध बँकेत लोकल बँक ऑफिसर (JMGS I) च्या ७५० पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया २० ऑगस्टपासून सुरू झाली आहे. पंजाब अँड सिंध बँकेच्या https://punjabandsindbank.co.in/ या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ सप्टेंबर २०२५ आहे.
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही विषयात पदवी
वयोमर्यादा– या भरतीसाठी वयोमर्यादा २० ते ३० वर्षे आहे. राखीव श्रेणीतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट मिळेल. एससी आणि एसटींना वयोमर्यादेत पाच वर्षे सूट आणि ओबीसींना तीन वर्षे सूट मिळेल.
पगार किती दिला जाईल?
पंजाब अँड सिंध बँकेत लोकल बँक ऑफिसर (जेएमजीएस I) यांचे वेतनमान ४८४८०-२०००/७-६२४८०-२३४०/२-६७१६०-२६८०/७-८५९२० आहे.
निवड कशी केली जाईल?
पंजाब अँड सिंध बँकेत लोकल बँक ऑफिसर (जेएमजीएस I) या पदासाठी भरती ऑनलाइन लेखी परीक्षा, स्क्रीनिंग, मुलाखत, अंतिम गुणवत्ता यादी, स्थानिक भाषा चाचणीद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा ऑक्टोबर २०२५ मध्ये घेतली जाईल.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज शुल्क सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसींसाठी ८५० रुपये अधिक कर आहे. तर एससी आणि एसटीसाठी १०० रुपये अधिक कर आहे.















Discussion about this post