जळगाव । जळगाव एमआयडीसी परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी बुधवारी रात्री छापेमारी करत ही मोठी कारवाई केली. छापेमारीत पोलिसांनी तीन बांगलादेशी महिलांची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकासह एकूण पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव एमआयडीसी परिसरातील हॉटेल तारा येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून घटनेची शाहनिशा केली. त्याअनुषंगाने सापळा रचला. बनावट ग्राहकाने देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांना सिग्नल दिला. त्यानंतर पोलिसांच्या टीमने हॉटेलवर छापा टाकत आरोपींना रंगेहाथ पकडलं.
या कारवाईत हॉटेल मालक योगेश देवरे, दोन कर्मचारी आणि दोन ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान या कारवाईत पकडण्यात आलेल्या महिलांना मराठी किंवा हिंदी भाषा येत नसल्याचं समोर आलं आहे. इतकेच काय तर त्यांना भारताचे राष्ट्रगीतही म्हणता आलं नाही. त्यामुळे त्या बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांना आहे.
याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.















Discussion about this post