जळगाव । सोन्याच्या भावात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत आहेत. काही दिवसापूर्वी ऐतिहासिक पातळी गाठणाऱ्या सोने दरात आता मोठी घसरण झाली. सोबतच चांदी देखील घसरण आहे. दरम्यान चांदीच्या भावात बुधवारी (२० ऑगस्ट) एकाच दिवसात दोन हजार ३०० रुपयांची घसरण झाली. यामुळे चांदी एक लाख १२ हजार रुपयांवर आली. सोन्याच्या भावात १०० रुपयांची घसरण होऊन ते ९९ हजार २०० रुपयांवर आले. त्यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला
१६ ऑगस्ट रोजी एक लाख १५ हजार २०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १७ ऑगस्ट रोजी ८०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख १६ हजार रुपयांवर पोहोचली होती.१८ ऑगस्ट रोजी मात्र त्यात एक हजार रुपयांची घसरण होऊन ती एक लाख १५ हजार रुपयांवर आली. त्यानंतर १९ रोजी पुन्हा ७०० रुपयांची घसरण झाली व चांदी एक लाख १४ हजार ३०० रुपयांवर आली.
दरम्यान सोन्याचे दर जवळपास महिन्याभरापासूनच १ लाखांपेक्षा जास्त आहे. प्रति तोळ्यामागे ग्राहकांना लाखो रुपये मोजावे लागत आहेत. याचसोबत त्यावर लागणाऱ्या जीएसटीमुळे अजून पैसे वाढवून द्यावे लागत आहे. मात्र आता दरात घसरण झाल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला.















Discussion about this post