Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 19, 2025
in जळगाव जिल्हा
0
हतनूरचे २४ दरवाजे दीड मिटरने उघडले ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
बातमी शेअर करा..!

जळगाव । पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे हतनूर धरणाची जलपातळी वाढली. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता सुमारे एक लाख २० हजार ७४२ क्यूसेकने विसर्ग सुरू असताना, तापी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागासह जिल्हा प्रशासनाने दिला.

हतनूर धरणाच्या पूर्णा व तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे आवक वाढली. धरण पातळीत झालेल्या वाढीमुळे पूर व्यवस्थापनासाठी सोमवारी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला. सोमवारी हतनूर धरणाचे सहा दरवाजे पूर्णपणे, तर १४ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले होते. ज्यामुळे तापीच्या पात्रात सुमारे ६४ हजार ७३२ क्यूसेकने विसर्ग सुरू होता.

त्यानंतरही पाण्याची आवक वाढताना दिसून आल्याने पाटबंधारे विभागाने आज मंगळवारी सकाळी हतनूर धरणाचे ४१ पैकी १६ दरवाजे पूर्ण क्षमतेने आणि आठ दरवाजे एक मीटरने उघडण्याचा निर्णय घेतला. परिणामी, तापी नदीच्या पात्रात सुमारे एक लाख २० हजार ७४२ क्यूसेकने विसर्ग सुरू झाला. पाण्याची आवक वाढल्यानंतर पुढील काही तासांत एक लाख २५ हजार ते दीड लाख क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढवला जाऊ शकतो, असे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.

दरम्यान, हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमापन केंद्रांवर मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात सुमारे ४२९ मिलीमीटर (सरासरी ४७.७ मिलीमीटर) पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. पैकी बऱ्हाणपुरात २५.४, देढतलाईत ९२.६, टेक्सामध्ये १२४.४, एरडीत १४.२, गोपालखेड्यात ४९.४, चिखलदऱ्यात ११.८, लखपुरीत ५२.०, लोहाऱ्यात २९.२ आणि अकोल्यात ३०.२ मिलीमीटर पाऊस पडला.

हतनूर धरणातील विसर्ग वाढल्याच्या स्थितीत शेळगाव बॅरेजचेही १८ दरवाजे आता एक मीटरने उघडण्यात आले आहेत. ज्यामुळे तापी नदीच्या पात्रात ४१ हजार ६९२ क्यूसेकने विसर्ग होत आहे. तापी आणि पूर्णा नदीच्या काठांवर राहणाऱ्या गावातील नागरिकांनी नदीच्या पात्रात न जाणे, पोहणे, मासेमारी करणे तसेच जनावरांना पाणी पिण्यास घेऊन जाणे टाळावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन जळगाव जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार जाहीर ; कोण आहे?

Next Post

आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेतले हे ४ मोठे निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेतले हे ४ मोठे निर्णय

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी? कृषिमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

March 5, 2026
भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

March 5, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांना महापालिकेचा मोठा दिलासा ; ५ ते १९ मार्चदरम्यान मालमत्ता करावर दंड माफीची सुवर्णसंधी

March 5, 2026
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page