अहिल्यानगर । अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथून एक भयंकर घटना समोर आलीय. ज्यात फर्निचर दुकानाला लागलेय भीषण आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मध्यरात्री सर्वजण झोपेत असताना ही दुर्दैवी घटना घडली. फर्निचरच्या दुकानाला नेमकी आग कशामुळे लागली? याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.
अहल्यानगर येथे नेवासा फाटा येथील फर्निचरच्या दुकानात मध्यरात्री एक वाजताच्या आसपास आग लागली. फर्निचर असल्याने आगीने रौद्ररूप घेतले. आग लागल्यानंतर धुराचे लोट मोठ्या प्रमाणात हवेत होते. या आगीमध्ये दुकानात असणारे पाच जणांचा होरपळून मृत्यू. एकच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर अहिल्यानगरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
यामध्ये मयूर अरूण रासने (वय 45 वर्ष), पायल मयूर रासने (वय 38 वर्ष), अंश मयूर रासने (वय 10 वर्ष), चैतन्य मयूर रासने (वय 7 वर्ष) या माय बापासह एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि आग इतकी भीषण होती कि या आगीत फर्निचरचे दुकान भस्मसात झाले आहे. तर दुकानाच्या पुढच्या बाजूला राहणारे कुटूंबीय धुराने गुदमरले आहेत.















Discussion about this post